गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आता मतदान ओळखपत्रही आधारला जोडा

voting ID
केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाकडे मतदान कार्ड आणि आधार जोडणीची मागणी केली आहे. आयोगाने कायदा मंत्रालयाला यासंदर्भात पत्र लिहिले असून मतदान कार्ड ‘आधार’शी जोडल्यास बोगस मतदानाला रोखता येईल, असे आयोगाने म्हटले आहे.
 
बोगस मतदानाला आळा घालून ‘एक व्यक्ती एक मत’ योग्य राबवायचे असेल तर मतदान कार्ड आधारला जोडणे आवश्यक असल्याची मागणी आयोग अनेक वर्षांपासून करीत आहे. आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. याचबरोबर ‘लोकप्रतिनिधी कायदा- १९५०’मध्ये सुधारणा करण्याची शिफारस आयोगाने केली आहे. मतदान कार्ड आणि आधार जोडणी वैकल्पिक असल्याचे आयोगाने आधी सांगितले होते. पण, मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे ए.के. जोती यांनी स्वीकारल्यानंतर आयोगाच्या समितीने आपली भूमिका बदलली होती. त्यानंतर आतापर्यंत ३२ कोटी आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी जोडण्यात आले आहेत.