आता व्हिंटेज वाहने जतन करता येणार, वेगळी नोंदणी प्रक्रिया निश्चित

nitin
Last Modified मंगळवार, 20 जुलै 2021 (08:00 IST)
व्हिंटेज म्हणजेच जुन्या, नामशेष झालेल्या मॉडेल वाहनांना जतन करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी,अशा व्हिंटेज मोटार वाहनांची वेगळी नोंदणी प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे,अशी माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.सध्या अशा वाहनांची नोंदणी करण्यासाठी कोणत्याच राज्यात निश्चित नियम अथवा नोंदणीची प्रकिया अस्तित्वात नाही.
नवीन नियम,एक सुलभ प्रक्रिया उपलब्ध करतील. या प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे,आधीच नोंदणीकृत असलेल्या वाहनांचा तोच जुना क्रमांक नव्या नोंदणीत कायम ठेवता येणार असून,नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी “VA” अशी नवी मालिका ( विशिष्ट नोंदणी चिन्ह) दिला जाणार आहे.

रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने CMVR 1989 मध्ये दुरुस्ती करत,व्हिंटेज मोटार वाहन नोंदणी प्रक्रिया निश्चित केली आहे.जुन्या, व्हिंटेज वाहनांचे जतन करण्याच्या परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी ही नोंदणी प्रक्रिया सुनिश्चित करण्यात आली आहे.
ठळक वैशिष्ट्ये

– सर्व दुचाकी/चारचाकी वाहने, जी 50 पेक्षा अधिक वर्षे जुनी असतील, आणि ती त्यांच्या मूळ रुपात सांभाळली गेली असतील,ज्यांच्यात कोणतीही मोठी दुरुस्ती करण्यात आली नसेल,अशा सर्व वाहनांना व्हिंटेज मोटार वाहन म्हटले जाईल.

– नोंदणी/पुनर्नोंदणी करण्यासाठीचे अर्ज फॉर्म 20 नुसार करता येतील.त्यासोबत, विमा पॉलिसी,शुल्क,वाहन परदेशी असल्यास,आणल्याची शुल्क पावती आणि आधी नोंदणी झालेल्या वाहनांचे जुने नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागेल.
– राज्य नोंदणी प्राधिकरण फॉर्म क्रमांक 23A नुसार, 60 दिवसांच्या आत नोदणी प्रमाणपत्र प्रदान करेल.

– ज्या वाहनांची आधीच नोंदणी झाली, त्यांना आपले आधीची नोंदणी चिन्हे कायम ठेवता येतील. मात्र, नव्याने नोंदणी करण्यासाठी नोंदणी “XX VA YY*”अशा प्रकारे केली जाईल.ज्यात VA चा अर्थ व्हिंटेज, XX च्या स्थानी राज्याचा कोड आणि YY च्या स्थानी दोन अंकी वाहन मालिका आणि * हा क्रमांक 0001 ते 9999 यापैकी, राज्य प्राधिकरणाकडून मिळालेला क्रमांक असेल.
– नव्या नोंदणीसाठीचे शुल्क 20,000 आणि पुनर्नोंदणीचे शुल्क 5,000 रुपये असेल.

– व्हिंटेज मोटर्स नियमित/व्यावसायिक स्वरूपात रस्त्यांवर चालवता येणार नाहीत.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

३८ महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये ६३० दहशतवाद्यांचा केला ...

३८ महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये ६३० दहशतवाद्यांचा केला खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये मे २०१८ पासून जून २०२१ दरम्यान कमीत कमी ६३० दहशतवाद्यांचा खात्मा केला ...

दिल्ली लहान मुलीवर बलात्कार: स्मशानभूमीतल्या कुलरचं पाणी ...

दिल्ली लहान मुलीवर बलात्कार: स्मशानभूमीतल्या कुलरचं पाणी आणायला गेली ती परतलीच नाही...
निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारं भयंकर प्रकरण राजधानी दिल्लीत घडलं आहे.

इंद्रा -21 चे उदघाटनसत्र

इंद्रा -21 चे उदघाटनसत्र
भारत-रशियासंयुक्त प्रशिक्षण अभ्यास INDRA2021 04 ऑगस्ट 2021 रोजी प्रुडबॉय रेंज, ...

कोरोनाव्हायरस :18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत ...

कोरोनाव्हायरस :18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत,दुसरी लाट संपलेली नाही
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. ...

कृषी कायद्यावरून खासदार भिडले

कृषी कायद्यावरून खासदार भिडले
बुधवारी संसद परिसरात केंद्रीय कृषी कायद्यांच्या मुद्यावर शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या ...