गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (15:05 IST)

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव फरार

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक तरुण आपल्या पत्नीला सोडून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी गायब झाला. तो  घरातुन गायब झाला आहे हे त्याच्या घरच्यांना कळल्यावर त्यांनी शोध सुरू केला. अनेक प्रयत्न करूनही तरुण सापडला नाही, तेव्हा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, त्यानंतरही या तरुणाचा शोध लागलेला नाही.
 
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आदित्य कुमार नावाच्या तरुणाचा विवाह रविवारी अहियापूर पोलिस स्टेशन परिसरात सेहवाजपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नामुळे वधू-वरांचे कुटुंबीय आनंदी होते. लग्नाच्या दुस-या दिवशी आदित्य वधूसोबत वरात घेऊन आपल्या घरी परतला. बुधवारी रिसेप्शन होणार होते मात्र ते गायब झाल्याने ते रद्द करण्यात आले.
 
आदित्यच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मंगळवारी संध्याकाळी आदित्य आपल्या पत्नीला बाजारात जाण्यास सांगून घराबाहेर पडला आणि त्यानंतर तो घरी परतलाच नाही. यानंतर कुटुंबीयांनी आदित्यचा खूप शोध घेतला. त्याचे कुटुंबीय त्याला सतत फोन करत होते, मात्र त्याचा फोन बंद होता. आदित्यचा कोणाशीही वाद नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 
 
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
काही मोठी घटना घडण्याची भीती असलेल्या कुटुंबीयांनी बुधवारी अहियापूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. अहियापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी रोहन कुमार यांनी आयएएनएसला सांगितले की, या प्रकरणी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मोबाईल सतत बंद येत आहे. जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे
 
Edited by - Priya Dixit