बुधवार, 8 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2023 (10:07 IST)

'राहुल गांधीच देशात नवी क्रांती घडवू शकतात', तुरुंगाबाहेर येताच सिद्धूंचं वक्तव्य

Rahul Gandhi  create a new revolution   Sidhus statement  after coming out of jail
राहुल गांधी हेच देशाची नवी क्रांती घडवू शकतात अशा आशयाचे विधान, तुरुंगाबाहेर येताच माजी क्रिकेटपटू आणि माजी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी केले. “ज्या ज्या वेळी हुकूमशाहीचा उदय झाला, तेव्हा क्रांती घडली आहे. अशा स्थितीत राहुल गांधी हे एक क्रांती घडवण्याच्या उद्देशाने आपल्या सर्वांच्या समोर आले आहेत,” असं वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं आहे.
 
नवज्योत सिंग सिद्धू हे काल (1 एप्रिल) एका वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आले. एका 34 वर्षे जुन्या खटल्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावलेली होती.
 
तुरुंगाबाहेर आल्यानंतर सिद्धू म्हणाले, “लोकशाही नावाची कोणतीही गोष्ट देशात शिल्लक राहिलेली नाही. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे.”
 
“अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. सरकारला आता सत्य ऐकावंसं वाटत नाही. सरकारी संस्था सध्या केंद्राच्या गुलाम बनल्या आहेत. सरकारला सत्य ऐकू गेलं पाहिजे आणि राहुल गांधीच देशात क्रांती घडवू शकतात,” नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.

Published By - Priya Dixit