बुधवार, 10 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (22:09 IST)

परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळले

Parambir Singh denied all the allegations against him
परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं होतं. परंतु परमबीर सिंह गुरूवारी मुंबई पोलिसांपुढे हजर झाले आहेत. तसेच त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. त्यासाठी सिंह यांची गुन्हे शाखेकडून ७ तास चौकशी करण्यात आली आहे. परंतु परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते बाहेर पडले. सिंह यांची या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली.
 
सिंग यांनी खंडणी मागितल्याचे आरोप बिमल अग्रवाल यांनी केले होते. तसेच सचिन वाझे यांनी पैसे मागितल्याचा आरोपही अग्रवाल यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे सचिन वाझे आणि बीमल अग्रवाल यांच्यातील संभाषणाबद्दल चौकशी करण्यात आली. विमल अग्रवाल आणि सचिन वाझे ऐकमेकांशी हॉटेल मालकांच्या पैशांबद्दल बोलत आहेत. अशा प्रकारचं संभाषण ऑडियो क्लिपच्या माध्यमातून समोर आलं होतं. परंतु माझा या संभाषणाशी कुठलाही संबंध नसल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मी बीमल अग्रवाल यांना ओळखत नाही. तुम्ही हे प्रश्न सचिन वाझे यांना विचारा. हे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणत्याही पैशांची मागणी केली नाही. असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे. आजच्या चौकशीमध्ये १२ युनिटचे अधिकारी बोलावण्यात आले होते. परंतु त्यांना परत पाठवण्यात आलं. युनिट ११ चे अधिकारी व डीसीपी यांनी त्यासंबंधीत माहिती मागितली आहे.