'अल्लाह हू अकबर' न म्हणार्या हिंदू महिलांवर हल्ला! Video
भाजप बंगालच्या एक्स पोस्टमध्ये दावा केला आहे की ही घटना कोलकात्याच्या धाकुरिया तलाव परिसरातील आहे. पोस्टमध्ये पुढे असा दावा करण्यात आला आहे की हिंदू महिलांना प्रथम अल्लाह हू अकबरच्या घोषणा देण्यास सांगण्यात आले. यावर हिंदू महिलांच्या गटातील एका महिलेने म्हटले की, हे सार्वजनिक ठिकाण आहे, धार्मिक नाही. तुम्ही आम्हाला जबरदस्ती करू शकत नाही, आम्ही हिंदू आहोत. या पोस्टमध्ये भाजपने बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये धार्मिक सलोखा असाच आहे का? आम्ही आधीच बांगलादेशात आहोत की पाकिस्तानात?
भारतीय जनता पक्षाच्या बंगाल युनिटने एक्स वर पोस्ट करून मोठा दावा केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये, बंगाल भाजपने आरोप केला आहे की कोलकातामधील मुस्लिम मुलींच्या एका गटाने हिंदू मुलींच्या एका गटावर हल्ला केला. यासोबतच, त्यांच्यावर अल्लाह हू अकबर म्हणण्यासाठी दबाव आणण्यात आला. संपूर्ण प्रकरण काय आहे, ते सविस्तरपणे समजून घेऊया.
व्हिडिओमध्ये, हेल्मेट घातलेली दुचाकीवर बसलेली एक महिला तिच्यासोबत घडलेल्या या कथित घटनेबद्दल बोलत आहे. मात्र ही महिला कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोलकाता पोलिसांनी काय म्हटले?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या कथित घटनेबद्दल बोलताना, कोलकाता पोलिसांचे सहआयुक्त (मुख्यालय) आयपीएस मीराज खालिद म्हणाले की, पोलिसांना सोशल मीडियावरून या घटनेची माहिती मिळाली. आतापर्यंत या प्रकरणाबाबत कोणत्याही पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. सहआयुक्त (मुख्यालय) मीराज खालिद म्हणाले, आम्हाला सोशल मीडियावरून या कथित घटनेची माहिती मिळाली. आतापर्यंत कोणीही कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. व्हिडिओची सत्यता काय आहे हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
दरम्यान कोलकाता पोलिसांमधील एका सूत्राने इंडिया टुडेला सांगितले की, उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतांद्वारे तक्रार करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही लेखी तक्रार दाखल झालेली नसल्याने, या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागत आहे.