मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (18:08 IST)

DSP सुरेंद्र सिंह यांना चिरडणार्‍यांचे पोलिस एन्काउंटर, एका बदमाशाला गोळी लागली

हरियाणाच्या मेवात येथे ज्यांनी डीएसपी सुरेंद्र सिंह यांना डंपरने चिरडले त्यांची पोलिसांशी चकमक झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एका बदमाशाला गोळी लागली आहे.जखमी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
विशेष म्हणजे, मंगळवारी हरियाणातील मेवातमध्ये एक दुःखद घटना घडली.गुप्त माहितीच्या आधारे डीएसपी सुरेंद्र सिंह हे अवैध खाणकाम रोखण्यासाठी एकटेच एका भागात पोहोचले होते.यादरम्यान आरोपींनी डीएसपीवर डंपर चालवून त्यांची हत्या केली.या प्रकरणातील आरोपींचा शोधही पोलिसांनी तीव्र केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, एका आरोपीला पोलिसांनी जखमी अवस्थेत अटक केली आहे.घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याने पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.यादरम्यान आरोपींची सीआयए सुरेंद्र सिद्धू आणि त्यांच्या टीमसोबत चकमक झाली.या भीषण चकमकीत एका आरोपीला गोळी लागली आहे.पोलिस लवकरच या प्रकरणाचा उलगडा करू शकतात.