Widgets Magazine
Widgets Magazine

बचत खाते उघडून पोस्ट ऑफिस करणार शेतकरी वर्गास मदत राज्यातला अभिनव उपक्रम

सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (10:33 IST)

केंद्र शासनाच्या रु.५०० व १००० च्या नोटा बंद करण्याचा ग्रामीण अर्थव्यस्थेवर व विशेषतः शेतकऱ्यांवर परीणाम झाला आहे. मात्र पोस्टाच्या खातेधारकांना त्यांच्या  बचत खात्यांवर जुन्या रु.५००/- व रु.१०००/- च्या नोटांनी अमर्याद भरणा (रु.५०,०००/- व पुढे पॅन कार्ड आवश्यक)करता येईल व रु.२४,०००/- प्रति खाते प्रति आठवडा रक्कम काढता येईल. 
 
आज गावागावात पोस्ट-ऑफीस असून बऱ्याच शेतकऱ्यांचे पोस्टात खाते आहेत. मात्र काही शेतकऱ्यांचे पोस्टात बचत खाते नाही. सदर अडचण लक्षात घेता ज्या शेतकऱ्यांचे पोस्टात बचत खाते नाही त्यांच्यासाठी टपाल विभागाच्या चांदवड उपविभागातर्फे लासलगाव व चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बचत खाते उघडण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
 
तरी, लासलगाव परीसरातील सर्व शेतकऱ्यांना सोमवार दि.२१.११.१६ रोजी सकाळी ०९:०० ते ०२:०० पर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सहकार्याने नवीन कृषी समिती आवार लासलगाव व चांदवड येथे सोबत २ फोटो व आधार कार्ड प्रत व मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा विज बिल प्रत किंवा शिधा-पत्रिका प्रत सोबत आणावी व विनामूल्य नवीन खाते उघडून घ्यावे असे आवाहन श्री.विशाल निकम, उपविभागीय डाक निरीक्षक,चांदवड उपविभाग यांनी केले आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांचे / नागरीकांचे यापूर्वी पोस्टात बचत खाते आहे त्यांनी पुस्तक आणून त्यात भरणा करावा.
 
मालेगाव विभागातील सर्व पोस्ट-ऑफीस हे सीबीएस ने जोडलेली असून ईतर कुठल्याही गावातील पोस्ट-ऑफीसमध्ये असलेल्या बचत खात्यात लासलगाव व चांदवड पोस्ट-ऑफिसमध्ये रु.२५,०००/- पर्यंत भरणा स्विकारला जाईल. तसेच, लासलगाव व चांदवड, निफाड, पिंपळगाव(ब.) पोस्ट-ऑफीसमधील बचत खात्यात सोयीनुसार  भरणा स्विकारला जाईल. रु.५०,०००/- पेक्षा जास्त भरणा/शिल्लक असल्यास पॅन कार्ड आवश्यक आहे.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

जे नोट बंदी विरोधी ते तर देश द्रोही मुख्यमंत्री नवीन वादाला सुरुवात

सर्वसामान्य जनता नोटाबंदीच्या निर्णयामुळे एकीकडे हवालदिल झाली आहे. तर दुस्र्कडे आपल्या ...

news

ट्रेनमधल्या मारामारीत महिलेचा चावा

मुंबईतल्या ट्रेनमधली मारामारी काही नविन नाही. यावेळी मात्र लोकलमध्ये दरवाजावर उभे ...

news

नाशिकमध्ये समर्थनार्थ महामोर्चा

नाशिकमध्ये काही दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चा यशस्वीरित्या पार पडला. आता याच धर्तीवर ...

news

तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे

देशात सुरु असलेल्या नोटबंदी आणि बदलावर अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका करत जर हा ...

Widgets Magazine