गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2024 (16:37 IST)

PM मोदींची मोठी घोषणा - एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवणार

Pradhan Mantri Suryoday Yojana
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिरात राम लल्लाचा अभिषेक करून परतताच मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार मदत करेल. पंतप्रधानांनी 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' जाहीर केली.
 
पीएम मोदींनी ट्विट करून म्हटले आहे की, "जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. आज अयोध्येतील प्राण-प्रतिष्ठेच्या शुभमुहूर्तावर माझा संकल्प आणखी दृढ झाला की, भारतीयांच्या घरावर स्वतःची सोलर रूफ टॉप सिस्टीम असावी.
 
पंतप्रधान म्हणाले, "अयोध्येहून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन "प्रधानमंत्री सूर्योदय योजना" सुरू करणार आहे. यामुळे गरिबांचे  आणि मध्यमवर्ग लोकांचे वीज बिल तर कमी होइलच शिवाय भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल."