testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रणवदानी वडिलांप्रमाणे मार्गदर्शन केलं: पंतप्रधान

“प्रणव मुखर्जी माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यांनी माझं बोट धरुन वडिलांप्रमाणे मार्गदर्शन केलं,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची स्तुती केली आहे. ‘प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी अ स्टेट्समन’, या फोटोंच्या पुस्तकांचं प्रकाशन राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. त्यावेळी मोदी बोलत होते.
मोदी म्हणाले की, “प्रणवदा वडिलांप्रमाणे माझी काळजी घेतात. ते कायम माझ्या प्रकृतीची काळजी करतात. उत्तर प्रदेश निवडणुकीतील माझं व्यस्त वेळापत्रक पाहून ते म्हणायचे की, इतकी धावपळ का करता? प्रकृतीचीही काळजी घ्या. खरंतर ही राष्ट्रपतींचं काम किंवा जबाबदारी नाही, पण ते असं करायचे. प्रणवदा कायम माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. मला प्रणव दा यांचं बोट पकडून दिल्लीच्या जीवनशैलीत पुढे जाण्याची संधी मिळाली. त्यांनी मला वडिलांसारखं मार्गदर्शन केलं.”


यावर अधिक वाचा :