1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (19:30 IST)

अण्णा हजारे यांना पंतप्रधान मोदी यांनी दिले पत्रातून हे उत्तर

prime minister
देशात लोकायुक्त आणि लोकपाल व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीमध्ये उपोषण करत आहेत. राज्यातले भाजपमधील गिरीश महाजनांसारखे मंत्री अण्णा हजारेंची समजूत घालण्यासाठी अनेकदा मध्यस्थी करताना दिसतात.तर केंद्र आणि राज्य सरकारला मागण्यांसंदर्भात आजपर्यंत अण्णा हजारे यांनी अनेक पत्र पाठवली आहेत. यामध्ये राज्य सरकारचं नाही, तर केंद्र सरकार आणि थेट पंतप्रधानांना देखील अण्णा हजारांनी पत्र पाठवली आहेत. या पत्रांना समाधानकारक प्रतिक्रिया अजूनतरी मिळाली नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अण्णांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. हे उत्तर वाचून अनेकांना हसावं की रडावं? हाच प्रश्न पडला आहे. पंतप्रधानांनी उत्तरच तसं दिलं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या एका ओळीचं उत्तर पाठवलं आहे. ‘आपका जनवरी १, २०१९ का पत्र प्राप्त हुआ, शुभकामनाओं सहित’,इतक्याच मजकुराचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयातून अण्णांना देण्यात आलं आहे. २५ जानेवारी २०१९ ही तारीख या पत्रावर टाकण्यात आली आहे. अण्णांच्या राळेगणसिद्धीतल्या पत्त्यावर हे पत्र पाठवण्यात आलं आहे. कोणतेही ठोस उत्तर तर नाहीत उलट असे पत्र यामधून काहीच बोध होत नाही त्यामुळे हजारे समर्थक चिडले आहेत. तर अण्णा हजारे यानी युपीएच्या क्लालात केलेल्या आंदोलनाचा मोठा फायदा भाजपाला झाला होता, तेव्हा आता भाजप काय आणि कोणत्या प्रकारे हजारे यांचे आंदोलन थांबावते याकडे सर्वांचे लक्ष आहे.