1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (08:42 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' योजनेची घोषणा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (10 ऑगस्ट) उज्वला 2.0 योजनेचा शुभारंभ करणार आहेत.यावेळी ते उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.

उज्ज्वला 2.0 योजनेत लाभार्थ्यांना यावेळी डिपोझिट न घेता एलपीजी कनेक्शन, पहिलं रिफिल मोफत आणि हॉटप्लेट देण्यात येणार आहे.
 
2021-22 अर्थसंल्पता पीएमयूवाय योजनेसाठी 1 कोटी अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
उज्ज्वला योजना 2016 मध्ये जाहीर करण्यात आली होती बीपीएल 5 कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन दिलं जाणार होतं.