गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (17:09 IST)

डॉक्टरांची किमया, तोडलेला हात पुन्हा जोडला

चंदीगड पीजीआयच्या डॉक्टरांनी पटियाला पोलिसांच्या एएसआय हरजितसिंग यांचा तोडलेला हात जोडला आहे. रविवारी सकाळी लॉकडाऊन तोडणाऱ्या एका शिखाने तलवारीने एएसआयचा हात कापला. ऑपरेशन थिएटरमध्ये साडेसात तास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. तुटलेला हात प्लास्टिक शस्त्रक्रियेद्वारे जोडला गेला आहे. पंजाबमध्ये रविवारी शिखांनी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं. त्याचवेळी तलवारीने पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी कारवाई करत पंजाब पोलिसांनी आता नऊ लोकांना अटक केली आहे.
 
पीजीआयने दिलेल्या माहितीनुसार, डीजीपी दिनकर गुप्ता यांनी रविवारी सकाळी ७.४५ वाजता पीजीआय संचालक जगत राम यांना फोन केला. डॉ. जगत राम यांनी इमरजंसी टीम त्वरित सक्रिय केली आणि प्रगत ट्रॉमा सेंटरमध्ये तयारी सुरू केली. प्लास्टिक सर्जरी विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक रमेश शर्मा यांच्याकडे पुन्हा हात जोडण्यासाठी टीम तयार करण्याची जबाबदारी पीजीआयने दिली.