रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मागासवर्गीया साठी राहुल गांधी यांचे आंदोलन

राहुल गांधी दिवसेंदिवस रोज नवीन आंदोलन आणि सरकारवर जोरदार टीका करत आहेत. जुने राहुल आता मागे पडले असून आक्रमक असे राहुल सर्वाना दिसत आहेत. आता अॅट्राॅसिटी कायद्यात बदल केल्याच्या निषेधार्थ संसद भवनाच्या परिसरात राहुल गांधी सोबत काँग्रेसने निदर्शनं केली आहे. या प्रकरणी  यावेळी "दलितो के सन्मान मैं, राहुल गांधी मैदान मैं" अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.

राहुल गांधींनी सरकारविरोधात  संसद भवनासमोर आंदोलन सुरू केल आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर  संसद भवन परिसरातल्या काँग्रेसचे नेते  आंदोलनाला बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या निर्णयाविरोधात अॅट्राॅसिटी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारने रिव्हू पिटीशन दाखल करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात करण्यात आलंय.

केंद्रातलं मोदी सरकार हे दलितविरोधी असल्याची घोषणाबाजीही काँग्रेस आंदोलकांनी यावेळी केली. त्यामुळे पुन्हा सरकार अडचणीत सापडले आहे.