Widgets Magazine

मायावतींविरुद्ध निवडणूक लढणार राखी सावंत

नवी दिल्ली- सतत वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहणारी राखी सावंत आता उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. राखीचा बसप प्रमुख मायावती यांचा विरुद्ध निवडणुकीत उतरण्याचा विचार आहे.
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास अठावले यांनी म्हटले की त्यांचे पक्ष भाजपसह युतीमध्ये आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत लढण्याच्या विचार करत आहे आणि जर बसप प्रमुख मायावती यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या विरोधात राखी सावंत उभी राहिली.
त्यांनी म्हटले की काही काळापासून मायावती स्वत: निवडणूक रिंगणापासून दूर राहतात. बघू या वेळेस काय होतं ते. या वेळी मायावती उतरल्यास त्यांच्यासमोर राखी सावंत आव्हान असेल.
अठावले यांनी म्हटले की भाजपासोबत आघाडी झाली नाही तर आरपीआय स्वबळावर 200 हून अधिक सीट्सवर आपले उमेदवार उभे करेल.


यावर अधिक वाचा :