Widgets Magazine
Widgets Magazine

पुन्हा एकदा गायकवाड यांचे विमान तिकीट रद्द

Last Modified बुधवार, 29 मार्च 2017 (08:57 IST)
एअर इंडियाने पुन्हा एकदा उस्मानाबादचे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचे मुंबई-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट रद्द केले आहे. बुधवार सकाळची गायकवाड यांची मुंबई ते दिल्ली प्रवासाची तिकीट एअर इंडियाने रद्द केली.
मागच्या आठवडयात रविंद्र गायकवाडांनी एअर इंडियाचे मॅनेजर आर. सुकूमार यांना चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांचा नो फ्लाय लिस्टमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे रविंद्र गायकवाडांच्या देशातंर्गत विमान प्रवासावर बंदी आली आहे.


यावर अधिक वाचा :