गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ओवेसींच्या व्यासपीठावर तरुणीकडून ’पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

सीएए आणि एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. एका मुलीने थेट व्यासपीठावरून ’पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. तातडीने संबंधित मुलीला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ’भारत जिंदाबाद था और रहेगा’, आम्ही ’पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेचे समर्थन करत नाही.
 
या सभेत असदुद्दीन ओवेसी भाषण करण्यासाठी उभे राहिले असता या मुलीने माईक हातात घेऊन ’पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तिला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, तिने तिचे बोलणे सुरूच ठेवले होते. मुलीने तुम्हाला ’पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते’, असे सांगत ’पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. ती घोषणा देत असताना खुद्द ओवेसींनी धावत जाऊन तिला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवले आणि तिच्या हातातून माईक हिसकावूननंतर तिला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले.