गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (10:14 IST)

आता मिठाची अफवा २०० ते ४०० रु किलो दर

सोशल मिडीयाचा समाजकंटक कसा फायदा घेतील त्या काही भरोसा नाही, एक वेगळीच अफवा आता समोर आली आहे. आपल्या  देशातील अनेक भागांमध्ये विशेष ग्रामीण आणि झोपडपट्टी भागातील  लोकांनी खुपसारे मीठ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. तर यामागे कारण पाहता  मीठाचा मोठा तूटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्या आहेत.  लोकं महाग मीठ खरेदी करु लागले आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्‍तराखंडमध्ये अशी अफवा पसरली की १५ ते १६ रुपयाला मिळणार मीठ २०० ते ४०० रुपयाला विकलं जाऊ लागलं आहे. लखनऊ, बरेली, दिल्ली, नोएडा आणि देशातील अनेक भागांमध्ये एका अफवेमुळे मीठ खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. तर मुंबई मधील अनेक भागात हे विक्री होत असल्याने दुकानदार सुद्धा गोंधळून गेले आहेत. तर अफवा जर पसरवली किवा ज्यांनी पसरवली त्यावर मुंबई आणि महराष्ट्रा पोलीस कारवाई करणार असून पोलिसांनी अनेक भागात जाऊन हा काळा धंदा बंद केला आहे. असे कोणी केल्यास पोलिसांना कळवा असे सांगितले आहे.