testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नोटाबंदीसंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांची संसदेत बैठक सुरू

Last Updated: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (12:52 IST)
- नवी दिल्ली : नोटाबंदी निर्णयावरुन विरोधकांचा गोंधळ, लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित
- पंतप्रधानांनी माफी मागण्याच्या मुद्यावर विरोधकांच्या गदारोळानंतर राज्यसभा दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्थगित.
- विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० वाजेपर्यंत स्थगित.
- नोटाबंदीविरोधी याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली असून २ डिसेंबर रोजी होणार पुढील सुनावणी होणार.
- नवी दिल्ली - नोटाबंदीला विरोध करत एका व्यक्तीने लोकसभा दालनात उडी मारण्याचा केला प्रयत्न, प्रेक्षक गॅलरीत गोंधळ, चौकशी सुरु.
- नवी दिल्ली : विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभा दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित - पंतप्रधानांनी विरोधक काळ्या पैशाला समर्थन करत असल्याचं म्हणत विरोधकांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे, शरद यादव यांची राज्यसभेत मागणी.
- संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरुच, राज्यसभेत पंतप्रधानांनी माफी मागण्याची विरोधकांची मागणी.
- नवी दिल्ली : पंतप्रधान ( नोटाबंदीच्या मुद्यावर) बाहेर बोलू शकतात, पण संसेदत नाही, याचा अर्थ नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे - बसपा प्रमुख मायावतींचा आरोप.
- नवी दिल्ली : जर पंतप्रधान प्रामाणिक आहेत आणि त्यांच्या या (नोटाबंदीच्या) निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नसेल तर याबद्दल संसदे
त बोलण्यात ( त्यांना) काय अडचण आहे - मायावती
- नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील उपस्थिती आणि सहभागाबाबतची मागणी कायम करत राहणार, विरोधकांच्या बैठकीतील निर्णय, सूत्रांची माहिती
- नोटाबंदीच्या मुद्यावर सरकार चर्चेसाठी तयार आहे पण विरोधक त्यापासून पळ काढत आहेत - अनंत कुमार, केंद्रीय मंत्री.
- नवी दिल्ली : नोटाबंदीसंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांची संसदेत बैठक सुरू


यावर अधिक वाचा :