बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2017 (10:05 IST)

चोरीला गेलेले कैलास सत्यार्थी यांचे सन्मानपत्र जंगलात सापडले

नोबेल पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांच्या घरातून काही दिवसांपूर्वी केलेल्या चोरीत दागिन्यांसोबतच नोबेल पुरस्काराची प्रतिकृतीही व सन्मानपत्र चोरट्यांनी लांबविले होते. आता एक महिन्यानंतर हे सन्मानपत्र पोलिसांना दिल्ली जवळच्या जंगलात सापडली आहे. त्याबद्दल सत्यार्थी यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ७ फेब्रुवारीला सत्यार्थी यांच्या घरातून दागिन्यांसोबतच नोबेलची प्रतिकृती व सन्मानपत्रही चोरीला गेले होते. पोलिसांनी तीन सराईत चोरांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून नोबेल प्रतिकृती व दागिने परत मिळाले. मात्र सन्मानपत्र त्यांनी कागदाचा तुकडा समजून जंगलात फेकले होते. पोलिसांनी या  माहितीच्या आधारे दोन दिवस दिल्ली जवळचे संगम विहारमधील जंगलात कसून तपास केल्यावर त्यांना हे सन्मानपत्र मिळाले.