शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2016 (12:29 IST)

शहीद सौरभ फराटेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले 61 राष्ट्रीय रायफल्सचे तोफंजी सौरभ फराटे (27) यांच्यावर फुरसुंगी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्रच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पम्पोर येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना सौरभ फराटे यांना वीरमरण आले. शहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांचे शरद पवार यांच्याकडून सांत्वन
 
शहीद जवान सौरभ नंदकिशोर फराटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खा. शरद पवार  यांनी त्यांचे सांत्वन केले. जम्मू-काश्मिर मधील पम्पोर भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. गेल्या १३ वर्षांपासून ते भारतीय सैन्यदलाच्या सेवेत होते. शहीद सौरभ फराटे पुण्यातील हडपसर मधील गंगानगर येथे राहत होते. शहीद सौरभ फराटे यांचे बाबा नंदकिशोर फराटे आणि सासरे मनोहर भोळे यांची पवार साहेबांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून, आम्ही आपल्या सदैव पाठीशी आहोत असा दिलासा त्यांनी फराटे कुटुंबीयांना दिला.