शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 (13:39 IST)

नोटा रद्द करण्याचे शरद पवारांकडून स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदींनी जाहीर केला.

त्यावर शरद पवारांनी ट्विटवर त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.यात त्यांनी सांगितले की, “500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. यामुळे काळ्या पैशाला आळा बसेल आणि दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा बंद होईल”.