शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (13:36 IST)

धक्कादायक ! 4 महिलांनी कॉटवर नेला मृतदेह

Shocking! Bodies carried by 4 women on the cotधक्कादायक ! 4 महिलांनी कॉटवर नेला मृतदेह Maharashtra National News In Webdunia Marathi
फोटो- साभार सोशल मीडिया
मध्य प्रदेशातील आरोग्य सेवाची फार दुर्दशा आहे. याची प्रचिती नुकतीच रीवा जिल्ह्यात पाहायला मिळाली. एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला जिवंतपणी रुग्णवाहिका मिळाली नाही किंवा तिच्या मृत्यूनंतर तिला शववाहन देखील मिळाले नाही
 
मिळालेल्या माहितीनुसार, रीवा जिल्ह्यातील मेहसुवा गावात मोलिया केवट (वय 80 वर्षे) आजारी होती, महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली होती, परंतु अनेक तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका आली नाही. वृद्ध महिलेची अवस्था पाहून कुटुंबीयांनी वृद्ध महिलेला कॉटवर झोपवले आणि रायपूर करचुलियन सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचले, तेथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
 
वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी सीएचसीमधील डॉक्टरांना शव वाहन बाबत विचारपूस केली असता सर्वांनी टाळाटाळ केली. मृतदेह न मिळाल्याने 4 महिला व एका मुलीने वृद्ध महिलेचा मृतदेह कॉटवर टाकला आणि 5 किमी अंतरावरील गावाकडे रवाना झाले. 
 
गावाच्या मार्गावर रायपूर करचुलियन पोलीस स्टेशन देखील आहे पण तिथेही त्या महिलांना मदत मिळाली नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांनी व्हिडिओ बनवून राज्यातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा पर्दाफाश केला. रायपूर कर्चुलियन सीएससीमध्ये शव वाहन देखील उपलब्ध नाही. 
 
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, जिल्हा मुख्यालयात केवळ रेडक्रॉस शव वाहन पुरवते. मृतदेह अन्यत्र नेण्याची काहीही व्यवस्था नाही. शववाहन पुरविणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे, परंतु राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मृत्यूनंतरही शववाहन  मिळत नाहीत. यापूर्वी छत्तरपूरमध्येही एका तरुणाचा मृत्यूच्या पाच तासांनंतरही शव वाहन मिळाले नाही, या मृतदेहाला कुटुंबीय दुचाकीला बांधून घेऊन जात होते, नंतर एका ऑटोचालकाने माणुसकी म्हणून हे मृतदेह गावात नेऊन सोडले.