1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (14:50 IST)

कुणीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे माझी बदनामी करत आहे-अब्दुल सत्तार

Someone
सत्ताधारी शिंदे गटातील एका आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा सुरू झालेली असताना खुद्द अब्दुल सत्तार यांनीच यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करतानाच जर आपल्या कुटुंबातील कुणी दोषी असेल, तर ते गुन्हेगार आहेत, असं देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाला असून त्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं समोर येत आहे.
 
“माझी बदनामी करण्याचा प्रयत्न”
अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हा सगळा आपली बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. “मला व्हॉट्सअपवर अशा प्रकारचा मेसेज दिसल्यानंतर मी स्वत: त्याचं स्पष्टीकरण दिलं. कुणीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे माझी बदनामी करत आहे. त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार”, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.