Widgets Magazine

राहुलचे प्रमोशन पुन्हा टाळलेच, अध्यक्ष सोनियाच

राहुलचे प्रमोशन पुन्हा टाळले राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा पूर्णविराम मिळाला आहे. सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा एका वर्षासाठी अध्यक्षपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक येत्या 7 नोव्हेंबर रोजी होणार असून या बैठकीत हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पक्षाने सलग दुसर्‍यांदा अध्यक्षपद राहुल गांधी यांना देण्याऐवजी सूत्रे सोनिया यांच्या हाती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनिय गाँधी यांच्या कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपला आहे. त्यांना 2010 मध्ये 5 वर्षासाठी अध्यक्षपदी निवडण्यात आले होते. 2015 मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना एक वर्षासाठी पुन्हा अध्यक्ष करण्यात आले होते. आता प्रकृती खराब असताना देखील त्यांच्यावरच अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :