मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सावत्र आईच्या सांगण्यावरून गँगरॅप, प्रायव्हेट पार्टमध्ये अॅसिड ओतले, डोळे फोडले

gang rape in jammu kashmir
उत्तरी काश्मिराच्या उरी भागात धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांप्रमाणे 14 वर्षाच्या सावत्र भावाने सावत्र आईच्या सांगण्यावरून आपल्या तीन मित्रांसह आपल्या 9 वर्षाच्या सावत्र बहिणीवर सामूहिक बलात्कार केला.
 
एवढ्यात मन भरले नाही तर मुलीचे डोळे काढले आणि तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि छातीवर अॅसिड ओतले. नंतर महिलेने मुलीला आपल्या घराजवळ जंगलात दफन केले.  
 
पोलिसांप्रमाणे 24 ऑगस्टला उरीच्या बोनियार ठाण्यात मुश्ताक अहमद गनी नावाच्या व्यक्ती त्याची नऊ वर्षाची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. मुलगी 23 ऑगस्टपासून बेपत्ता होती. मुलीचं मृतदेह रविवारी जमिनीतून भयंकर अवस्थेत काढण्यात आलं.  
 
कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बघून पोलिसही हादरले. तिच्यावर बलात्कार झाला असून पोलिसाने पाची आरोपींना अट केली आहे.
 
बारामुल्ला येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी मीर इम्तियाज हुसैन यांच्याप्रमाणे कौटुंबिक वादामुळे महिलेने ही योजना आखली.  
 
आरोपी आईने सांगितले की तिच्या पतीची दुसरी पत्नी आणि मुलांच्या संपर्कात असल्यामुळे तिला त्यांचा राग होता. दुसरी पत्नी आणि तिचा संसार खटकत असल्यामुळे तिने आपल्या मुलाची मदत घेऊन हे कारस्थान केले. आईच्या सांगण्यावरून बलात्कार करून हे घाणेरडं कृत्य केले गेले आणि हे सर्व घडताना सावत्र आई तिथे उपस्थित होती.