1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (13:25 IST)

दुर्गा पंडालमध्ये अचानक अस्वलाचा प्रवेश

Chhattisgarh News
छत्तीगड मध्ये जंगली प्राण्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. बिबट्या, हत्ती, चित्ता, अस्वल सध्या गावांमध्ये घुसून दहशत पसरवीत आहे. तसेच काळ रविवारी कांकेरच्या लारगांव मध्ये एक जंगली अस्वल थेट दुर्गा पंडालमध्ये घुसले. अस्वलाला अचानक आलेले पाहून उपस्थित लोकांमध्ये एकच गोंधळ झाला सारे जण सैरवैर पळू लागले. या घटनेचा व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. सुदैवाने तेथील लोकांचा गोंधळ पाहून अस्वलाने हल्ला केला नाही. व निघून गेले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार दुर्गा पंडालमध्ये तयार होणारे तेल पिण्याच्या लोभापोटी अस्वलाने पंडालमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. पंडालमध्ये झोपलेले लोक अचानक अस्वलाला समोर पाहून घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. तसेच नागरिकांचा आवाज ऐकून अस्वलही घाबरले आणि पळून गेले. सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही अशी माहिती समोर आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik