testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शहीद जवानाच्या वडीलांना मुलाच्या मृत्यबाबत संशय

sukhoi-30-crash-pilot
Last Modified शुक्रवार, 7 जुलै 2017 (12:32 IST)

भारत-चीन सीमेजवळ मे महिन्यात झालेल्या दुर्घटनेत झालेले सुखोई विमानातील पायलट यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. शहीद एस.अचुदेव यांच्या वडिलांनी दुर्घटनाप्रकरणी उच्च स्तरिय चौकशीची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वायु सेना प्रमुख बिरेंद्र सिंह धनोवा यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी मुलाच्या मृत्यबाबत संशय व्यक्त केला आहे.


फ्लाईट लेफ्टनंट अचुदेव आणि स्क्वॉड्रन लीडर डी. पंकज यांच्या सुखोई विमानात 23 मे रोजी भारत-चीन सीमेवर अपघात झाला. दुर्घटनेच्या तीन दिवसांनंतर विमानाचे अवशेष आढळून आले.
यानंतर दोन्ही शहिदांचं पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात आले. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, घरी आलेल्या शवपेटीत त्यांच्या मुलाचे पार्थिव नव्हते. असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.


यावर अधिक वाचा :