testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बीबीसीच्या प्रभावशाली महिलांच्या यादीत सनी लिऑनी

Last Modified गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (09:45 IST)
बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या 2016 मधील प्रभावशाली महिलांच्या यादीत सनी लिऑनीचा समावेश झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून बीबीसी ही यादी जाहीर करत आहे. यात क्रीडा, फॅशन, कलाकार, उद्योजक, अभियंता इत्यादी क्षेत्रात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या 100 प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत सनी सोबतच आणि चेन्नईमधील महिलांचाही समावेश आहे. कम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये ठसा उमटवणारी सांगलीची 20 वर्षी गौरी चिंदरकर, मुंबईतील अभिनेत्री आणि लेखिका नेहा सिंह, ट्रॅक्टर क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईतील श्रीनिवासन ट्रॅक्टर कंपनीच्या सीईओ मल्लिका श्रीनिवासन, 105 वर्षीय कर्नाटकच्या पर्यावरणवादी सालुमराडा थिमाक्का यांनाही स्थान मिळाले आहे.


यावर अधिक वाचा :