पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोरच्या शाही परिवाराचाच अधिकार

 
Last Modified सोमवार, 13 जुलै 2020 (16:05 IST)
केरळमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा श्री पद्मनाभस्वामी मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यामध्ये न्यायालयानं अखेर आज निकाल दिला आहे. या निकालानुसार पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोरच्या शाही परिवाराचाच अधिकार असेल. या मंदिरावरच्या अधिकारांवरून काही वर्षांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. मंदिराच्या आत असलेल्या ७ कक्षांमध्ये लाखो कोटींची संपत्ती असल्याचे दावे केले जात आहेत. त्यातले काही दरवाजे उघडल्यानंतर आत मोठी संपत्ती देखील सापडली असून अजूनही काही दरवाजे उघडले गेलेले नाहीत. दरम्यान, या निर्णयानंतर राज्य सरकारला पद्मनाभस्वामी मंदिरावरचा आपला हक्क सोडावा लागणार आहे.
श्री पद्मनाभस्वामी मंदिराबाबत अनेक गूढ गोष्टी आजपर्यंत कायम आहेत. हे मंदिर नक्की कधी बांधलं गेलं, याविषयी अनेक तर्क आहेत. काहींच्या मते मंदिर ५००० वर्ष जुनं आहे, तर काहींच्या मते हे मंदिर १६व्या शतकात बांधण्यात आलं आहे. ऐतिहासिक दस्तावेजांनुसार १८व्या शतकात त्रावणकोरच्या शाही घराण्याचे महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वत:ला पद्मनाभस्वामींचे दास म्हणून जाहीर केलं होतं. तेव्हापासून या मंदिराचे अधिकार याच घराण्याकडे आहेत. मंदिराच्या आवारात असलेल्या ७ कक्षांमध्ये अमाप संपत्ती असल्याचं देखील मोठं गूढ आहे. या कक्षांचे दरवाजे उघडल्यास अघटित होईल अशी दंत कथा आहे. त्यामुळे गेल्या शेकडो वर्षांपासून हे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. शेवटी मंदिराचे अधिकार केरळ सरकारकडे आल्यानंतर हे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. अजूनही काही दरवाजे उघडण्यात आलेले नाहीत.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

दिल्ल्लीला जाणार आहात, आधी बातमी वाचा मगच नियोजन करा

दिल्ल्लीला जाणार आहात, आधी बातमी वाचा मगच नियोजन करा
देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढतेय. यापार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय ...

मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम, ...

मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम, राष्ट्रपतींनी केले उद्घाटन
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी जगातील सर्वात मोठे सरदार क्रिकेट स्टेडियम आणि ...

यूपीचे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुशीनगर येथे होईल, ...

यूपीचे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुशीनगर येथे होईल, डीजीसीएने ग्रीन सिग्नल दिले
उत्तर प्रदेशचे ऐतिहासिक शहर, कुशीनगरला मोठी भेट मिळाली आहे. येथील विमानतळाला डीजीसीएकडून ...

उद्धव ठाकरे यांना भाजप खासदारांचा सल्ला - कोरोना ...

उद्धव ठाकरे यांना भाजप खासदारांचा सल्ला - कोरोना महाराष्ट्रात नियंत्रणात नाही, म्हणून अमित शहा यांची मदत घ्या
महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाचे ...

पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीला महाराष्ट्रात परवानगी नाही

पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीला महाराष्ट्रात परवानगी नाही
कोरोनिल’ औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता ...