गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 15 मार्च 2018 (08:45 IST)

अयोध्या राममंदिर प्रकरण : मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द

suprime court

योध्या राममंदिर प्रकरणी बुधवारपासून  सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. त्यामध्ये  सर्वोच्च न्यायालयाने  पहिला आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द केले. केवळ मुख्य पक्षकाराचीच बाजू खटल्यात ग्राह्य धरली जाणार आहे. इतर याचिकामुळे अनावश्यक हस्तक्षेप होत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षण नोंदवले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दाखल झालेल्या २० हस्तक्षेप याचिका फेटाळून लावल्या. याचिकाकर्त्यांमध्ये सुब्रमण्यम स्वामी, श्याम बेनेगल, तिस्ता सेटलवाड, अपर्णा सेन यांचा देखील समावेश आहे. या खटल्यात निर्मोही आखाडा, रामलल्ला आणि  सुन्नी वक्फ मंडळ हे तीन पक्षकार असतील.