testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पोलिस ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १ शहीद ४ जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पोलीस दलातील एक जवान शहीद झाला असून यात चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सीआरपीएफच्या जवानांचाही समावेश असल्याचे समजते.
पुलवामा येथे डिस्ट्रीक्ट पोलीस लाईन येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. सुमारे दोन ते तीन दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त आहे.दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून पोलीस दलातील दोन आणि सीआरपीएफचे दोन जवान या हल्ल्यात जखमी झाले. पोलिसांनीही दहशतावाद्यांना प्रत्युत्तर दिले असून अद्याप चकमक सुरु आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाची तुकडी रवाना झाली आहे. परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर येत आहे.


यावर अधिक वाचा :