शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 एप्रिल 2024 (18:06 IST)

केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, महाराष्ट्रातील कांदा निर्यातीला परवानगी दिली

onion
केंद्र सरकारने गुजरातमधील 2 हजार मेट्रिक टन पांढरा कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून या वर विरोधकांनी टीका केली. आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केली. या वर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. 

महाराष्ट्रात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात केले जाते. महाराष्ट्र हे कांदा निर्यातीसाठी पुरवठादार राज्य आहे.मात्र कांदा निर्यातीवर बंदी केंद्र सरकारने आणली होती. यामुळे शेतकरी बांधव नाराज होते. कांदा निर्यातीवर बंदी असल्यामुळे कांद्याला योग्य दर मिळत नव्हते. आता यावर गुजरात मधून 2 हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आल्यावर महाराष्ट्रातील कांद्याचे काय असा प्रश्न विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. तसेच कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे संगितले. 

यावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांदा निर्यातीला परवानगी दिली असून आता 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाऊ शकतो.  
Edited By- Priya Dixit