देशातील पहिली घटना मटण दरासाठी या जिल्ह्यात स्थापन झाली समिती

mutton
शहर वजिल्ह्यातील मटण दराबाबत सविस्तर अभ्यास करुन तोडगा काढण्यासाठी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने ७ डिसेंबररोजी आपला अहवाल जिल्हादंडाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे.* मटण दरावरुन शहरात काही ठिकाणी मटण विक्रेते व ग्राहक यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नागरिक आणि पक्ष संघटनांनी आंदोलनेही केली.
खाटीक समाज आणि मटण दरवाढ कृती समिती यांची आज जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांच्या दालनात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली.
महापालिका आरोग्य अधिकारी या समितीचे अध्यक्ष
तर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त हे सदस्य सचिव आहेत. बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, आर के पोवार, सुजीत चव्हाण, विजय कांबळे, प्रकाश प्रभावळकर, रहीम खाटीक, राजू शेळके, किरण कोतमिरे आणि कसबा बावडा येथील श्री पाटील हे या समितीचे सदस्य आहेत. या समितीने शहर आणि जिल्ह्यामधील बकरा मटण बाबत सविस्तर अभ्यास करुन कृती समिती आणि मटण विक्रेते यांच्या भूमिकेबाबत तोडगा काढण्यासाठी सविस्तर अहवाल ७ डिसेंबर रोजी जिल्हादंडाधिकाऱ्यांना सादर करायचा आहे.अशाप्रकारे समिती स्थापन करून मटण दर निश्चित करण्याचे बहुदा हे देशातील एकमेव उदाहरण असेल. संघर्ष करणारे नागरिक व ज्यांच्या विरुद्ध संघर्ष आहे अशा दोघांनाही एकत्र करून मटण दरासाठी समिती नेमण्याचे काम जिल्हाधिकारी यांचेकडून होत आहे. समाजात सुसंवाद राहावा यासाठी जिल्हाप्रशासनाकडून होणारे प्रयत्नही आगळे-वेगळे आहेत.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

पुणे आणि सूरतशी जोडले जाईल इंदौर, दोन एयरलाईन्सने सहमती

पुणे आणि सूरतशी जोडले जाईल इंदौर, दोन एयरलाईन्सने सहमती
देवी अहिल्याबाई होळकर अंतरराष्ट्रीय एयरपोर्टहून लवकरच गुजरातचे प्रमुख शहर सूरत आणि ...

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ...

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्व पूर्तता झाली असून ...

अनुराग कश्यप, विकास बहल आणि तापसी पन्नू यांच्या घर आणि ...

अनुराग कश्यप, विकास बहल आणि तापसी पन्नू यांच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापा टाकला
प्राप्तिकर विभागाने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नू ...

आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक: राहुल गांधी

आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक: राहुल गांधी
नवी दिल्ली- काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी आजीचा आणीबाणी ...

बत्तीगुल' प्रकरणामागे चीनचा हात, गृहमंत्र्याची माहिती

बत्तीगुल' प्रकरणामागे चीनचा हात, गृहमंत्र्याची माहिती
मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० रोजी अचानक वीज गेली होती. यामागे चीनचा हात होता,