मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 7 जून 2018 (11:39 IST)

एल्गार परिषदेचे आयोजक ढवळेंसह चौघांना अटक

The organizers of the Elgar Council
कोरेगाव भीमा हिंसाचार
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे,वकील सुरेंद्र गडलिंग आणि नक्षलवादी समर्थक रोना विल्सन याला अटक करण्यात आली आहे.
 
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी ताजी माहिती समोर आली असून त्यानुसार पुण्यात आयोजित एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे यांना त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील घरातून पुणे पोलिसांकडून पहाटे अटक करण्यात आली. त्याचबरोबर वकील सुरेंद्र गडलिंग आणि महेश राऊत यांना नागपुरातून तर रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
 
पुण्यातील हिंदू एकता आघाडीचे मिलिदिं एकबोटे यांच्यावर यापूर्वी अटकेची कारवाई झाली आहे. या तिघांचाही या हिंसाचारात हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरु असून दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी या तिघांच्याही कार्यालयांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर पुण्यातील कबीर कला मंचच्या दोन कार्यकर्त्यांची चौकशीही करण्यात आली होती.
 
31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे एल्गार परिषद झाली होती. या परिषदेत चिथावणीखोर भाषणे आणि गाणी गायली होती. त्यामुळेच 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग हे नक्षलवाद्यांचे  वकील म्हणून ओळखले जातात. नक्षलवाद्यांचे खटले ते लढवतात, ते देखील या हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असून त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, महेश राऊत हे मूळचे गडचिरोलीचे असून सध्या नागपूरध्ये राहतात. त्याचे मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) या नामांकित संस्थेतून शिक्षण झाले आहे. येथून बाहेर पडल्यानंतर ते नक्षलवाद्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर दिल्लीतील नक्षलवादी चळवळीशी संबंधित असलेल्या प्रा. साईबाबा याची जागा चालवणारा नक्षलवादी समर्थक रोना विल्सन याला देखील पुणे पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.