1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (09:17 IST)

वसुंधरा राजे स्वत:ला आयसोलेट केले

three leaders
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे.  बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. वसुंधरा राजे यांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिने लखनऊमध्ये आयोजित केलेल्या पार्टीला हजेरी लावली होती. 
 
या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स आणि नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. या पार्टीला वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यंत हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून वसंधुरा राजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वत:ला इतरांपासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला. आम्ही योग्य ती काळजी घेत असल्याचे वसुंधरा राजे यांनी सांगितले. त्यामुळे आता या पार्टीला उपस्थित असणाऱ्या इतर लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय बळावला आहे. या पार्टीमध्ये बॉलिवूडचे जवळजवळ १०० सेलिब्रेटी सहभागी झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक बडे राजकीय नेतेही पार्टीला उपस्थित होते.