1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अमृतसर अपघात : लोकांनी म्हटले खोटं बोलतोय ट्रेन चालक

amritsar accident
मानावाला आणि अमृतसरदरम्यान रावण दहनाच्या कार्यक्रमाप्रसंगी घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर ट्रेन चालकाने म्हटले की ट्रॅकवर गर्दी पाहताच आपत्कालीन ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण संतप्त जमावाने दगडफेक केल्यामुळे गाडी थांबवली नाही. परंतू प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या गावकऱ्यांनी ट्रेन चालकाचा हा दावा फेटाळून लावला आहे.
 
प्रत्यक्ष साक्षीदार नगरसेवक शैलेंदर सिंगप्रमाणे मी घटनास्थळी होतो आणि ट्रेन थांबवणे तर सोडा ट्रेनची स्पीडदेखील कमी केली गेली नाही. असे वाटत होते जणू चालकाला आम्हाला चेंगारायचे आहे. अनेक लोकांचा जीव जात असतानाच्या दुःखद प्रसंगात आम्ही गावकरी ट्रेनवर दगडफेक करण्याच्या मनस्थितीत कसे असे असू शकतो.