गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (12:23 IST)

गायींना वाचवण्याच्या नादात दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला

Two youths died in an accident while trying to save the cowsगायींना वाचवण्याच्या नादात दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला Marathi National News  In Webdunia Marathi
मध्य प्रदेशातील राजगढमध्ये एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेगाने धावणारी ही कार नियंत्रणाबाहेर जाऊन 40 फूट खोल विहिरीत पडली, या कारमधील दोन प्रवासी बजरंग दल आणि इतर हिंदू जागरण मंचचे नेते होते, अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
राजगडमधील खुजनेर रोडवरील बारखेडा गावात ही घटना घडली. रविवारी रात्री उशिरा कार विहिरीत पडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील दोन तरुणही कारसह खोल पाण्यात पडले होते, तर तिसऱ्या तरुणाने कार विहिरीत पडण्यापूर्वी कारमधून उडी मारली होती, त्याला नंतर इंदूरला रेफर करण्यात आले.
4तासांच्या बचावकार्यानंतर सोमवारी पहाटे 5 वाजल्याचा सुमारास पाण्यात पडलेल्या कारला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आणि कारमध्ये अडकलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह आढळले , त्यांची ओळख बजरंग दलाचे विभागीय अधिकारी राज सिसोदिया आणि हिंदू जागरण मंच.जिल्हा सरचिटणीस लखन नेजर अशी झाली आहे . हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
राजगड पोलिस स्टेशनचे एएसआय सोमनाथ भारती यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रस्त्यावर दोन गायी मृतावस्थेत पडल्या होत्या, गायींना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव वेगाने जाणारी कार नियंत्रणाबाहेर जाऊन विहिरीत पडली. त्यामुळे हा अपघात झाला .