1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 जून 2017 (13:26 IST)

उत्तर प्रदेशच्या बरेलीत बस-ट्रकच्या धडकेत 22 लोक जिवंत जळाले

up bus accident
उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या बसला ट्रकची धडक लागताच आगडोंब उडाला. आगीच्या भडक्यात 22 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच इतर 15 प्रवाश्यांना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.
 
बरेली जिल्ह्यातील बिथरीचैनपूर परिसरात हा अपघात घडला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रविवारी रात्री उशीरा 2 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-24 वर दिल्लीहून बस येत होती.
 
सुत्रांच्या माहितीनुसार, बस चुकीच्या बाजूने येत होती. त्यामुळे, लखनौच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक बसली. ट्रकची धडक लागताच बसच्या डीझेल टँकमध्ये स्फोट झाला. यानंतर लागलेल्या आगीत काही क्षणांतच बसचा कोळसा झाला.
 
या आगीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावर पोलिस अधीक्षकांसह इतर पोलिस अधिकारी हजर असून सविस्तर तपास केला जात आहे.