गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

उरी हल्ला: लष्कर-ए-तोयबाने स्वीकारली जबाबदारी

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील उरी येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘लष्कर- ए- तोयबा’ने स्वीकारली. उरी येथील दहशतवादी हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते.
 
सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत असून त्यात पाकिस्तानच्या पंजाब येथील गुजरांवालामध्ये उरी हल्ल्यात ठार झालेल्या एका दहशतवाद्याच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ‘जमात- उद- दावा’ चा म्होरक्या आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा ‘मास्टरमाईंड’ हाफिज सईद मार्गदर्शन करणार आहे. उरी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन देशातील संबंध विकोपाला गेले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे पोस्टर उर्दू भाषेमध्ये आहे. 
 
लष्करचा मोहम्मद अनस ऊर्फ अबू सराका याला उरी हल्ल्यावेळी ‘शहादत’ मिळाली. आमच्या लष्करांनी 177 भारतीय जवानांना मारले आहे, असा दावाही या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.