बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (16:44 IST)

उपराष्ट्रपतीही सरकारच्या शेेतकरीविरोधी असण्याबाबत नाराज

सरकारकडून कृषी क्षेत्राकडे अपेक्षेप्रमाणे लक्ष दिले जात नाही, अशी खंत खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वृत्त लोकसत्ता या वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. उपराष्ट्रपती यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात सरकारच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याबाबत खंत व्यक्त केली. शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमालाचे उत्पादन करतो. मात्र, त्याला त्याचे दर ठरवण्याचे अधिकार नाही. शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. ते आपल्या मुलांना शेतीपासून दूर ठेवू लागले आहेत, ही चांगली बाब नाही. कृषी क्षेत्राला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील अर्थसंकल्पात तरतूद वाढवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.