चंदीगड विद्यापीठातील 60 विद्यार्थिनींचा व्हिडीओ व्हायरल, 8 जणांनी केला आत्महत्येचा प्रयत्न
पंजाबमधील मोहाली येथील चंदिगड विद्यापीठात शनिवारी रात्री उशिरा प्रचंड गोंधळ झाला.एका विद्यार्थिनीने वसतिगृहातील 60 मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून एका तरुणाला पाठवल्याचा आरोप आहे. शिमल्यातील त्या तरुणाने हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकून व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींपैकी 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थी बराच दिवसांपासून आंघोळ करताना वसतिगृहातील मुलींचे व्हिडिओ बनवत असे.हा प्रकार वसतिगृहातील मुलींच्या लक्षात येताच त्यांनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली.व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.एवढेच नाही तर हे कोणालाही सांगू नये म्हणून व्यवस्थापनाने त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे. विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या गोंधळाची माहिती पोलिसांना मिळताच पथक बळ घेऊन तेथे पोहोचले, मात्र त्यांनाही तेथे विरोधाचा सामना करावा लागला. पोलिसांनी व्हिडिओ पाठवणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतले आहे. गोंधळानंतर पोहोचलेल्या नातेवाईकांनीही या संपूर्ण प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.