1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (21:22 IST)

काय सांगता,एका प्रवाशासह एयर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले

What to say
नवी दिल्ली: संयुक्त अरब अमिरात मध्ये राहणारा एसपी सिंग ओबेरॉय नावाच्या भारतीय व्यावसायिकाला त्या क्षणी मोठा आश्चर्याचा धक्का बसला ,जेव्हा त्यांनी स्वतःला एकट्याने अमृतसर ते दुबईच्या एअर इंडियाच्या विमानात इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर प्रवास करताना बघितले. 
 
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ओबेरॉय हे बुधवारी पहाटे 3 वाजून 45 मिनिटावर अमृतसरवरून उड्डाण करणाऱ्या एयर इंडियाच्या विमानात जाणारे एकटेच प्रवाशी होते.दुबई जाणाऱ्या या विमानात त्यांनी 3 तासाचा प्रवास केला. ओबेरॉय यांच्या कडे गोल्डन व्हिसा आहे.ज्यामुळे ते युएईमध्ये 10 वर्षे राहू शकतील.उड्डाण दरम्यान त्यांनी क्रू मेंबर्स समवेत छायाचित्र घेतले.या संदर्भातील निवेदनाच्या विनंतीला एअर इंडियाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या 5 आठवड्यांत दुबईला जाणाऱ्या विमानात फक्त एकच प्रवाशी असण्याची ही तिसरी वेळ आहे.
 
मुंबई ते दुबई जाणाऱ्या विमानात 19 मे रोजी 40 वर्षीय भावेश झवेरी नावाचे एकमेव प्रवाशी होते.3 दिवसानंतर ओस्वाल्ड रोड्रिगेज नावाच्या एका व्यक्तीने एयर इंडियाच्या विमानाने मुंबई ते दुबई प्रवास एकट्यानेच केला होता. साथीच्या रोगाच्या पूर्वी जास्त मागणीमुळे भारतातून दुबई जाणाऱ्या विमानात बरेच लोक प्रवास करायचे. कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगा नंतर या मार्गावरील प्रवाश्यांची संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.