बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: श्रीहरिकोटा : , शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (09:10 IST)

इस्रोचे ‘लाडके बाळ’ झेपावले

जीसॅट-६ हा भारताचा प्रगत दळणवळण उपग्रह पृथ्वीच्या स्थिर कक्षेत स्थापित करण्यात यश आल्याची घोषणा इस्रोने केली. हे ‘खोडकर बाळ’ आता इस्रोचे सर्वांत लाडके बाळ बनले आहे, अशी प्रतिक्रिया मिशन संचालक आर. उमामेश्वरन यांनी व्यक्त केली. 
 
आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जीसॅट-६ या उपग्रहाचे जीएसएलव्ही-डी६ या रॉकेटच्या साहाय्याने प्रक्षेपण करण्यात आले. 
 
जीएसएलव्ही-डी६ ने उपग्रह अंतराळात सोडल्याच्या १७ मिनिटांनंतर तो भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात यश आले. एस बँड आणि सी बँडच्या दूरसंचार यंत्रणेसाठी या जीसॅट-६ उपग्रहाचा वापर केला जाणार आहे. स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर करून दोन टनापर्यंतचा उपग्रह अंतराळात 
प्रक्षेपित करणारी इस्रो ही सहावी संस्था आहे.