शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (11:21 IST)

'ताजमहाल'वर शिया पथियांनी दावा

आग्रा-प्रेमाचे प्रतिक समजले जाणारे आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या 'ताजमहाल'वर शिया समुदाने दावा सांगितला आहे. मुमताज या शिया समुदायाच्या होत्या. त्यामुळे ताजमहालचा ताबा शिया वक्फ बोर्डाकडे देण्यात यावा, अशी मागणी शिया समुदायच्या लोकांनी केली आहे.  मुमताज शिया पंथीय होत्या, लखनौचे इमाम-ए-रजा कमिटीचे अध्यक्ष फय्यर हैदर यांनी दावा केला आहे. त्यासाठीचे पुरावे म्हणून त्यांनी ताजमहालच्या आर्किटेक्टची माहिती दिली. ते म्हणाले, ताजमहाल हा एक मकबरा आहे आणि त्याच्या पश्चिमेला मशिद आहे.
 
यापूर्वी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी ताजमहाल सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडे देण्याची मागणी केली होती. हैदर यांच्या मते, मशिदीजवळ एका पाण्याचा हौद आहे. पारंपरिदृष्ट्या पाहिले तर, शिया समुदायात नमाज अदा करण्यापूर्वी वजू (हात आणि तोंड धुण्याची पद्धत) करतात. त्यामुळे ताज ही शिया इमारत असल्याचे सिद्ध होते, असा तर्क त्यांनी मांडला आहे.
 
'इमाम-ए-रजा'समितीने या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पत्र लिहिले आहे.