1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्री पाचवा दिवस : आईप्रमाणे स्नेह देणारी स्कंदमाता

skandamata stroy
दुर्गेचे पाचवे रूप ' स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. भगवान स्कंदाची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.



स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्युलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो.