शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (09:55 IST)

मंगल कलश घरात ठेवण्याचे फायदे जाणून

कलश किंवा घटची स्थापना आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो. घरात वास्तुशांत असो, सत्यनारायणाची पूजा असो, लक्ष्मीपूजन असो, नवरात्र असो किंवा यज्ञ-विधी. सर्व मांगलिक आणि शुभ कार्यात कलश ठेवतात. आज आम्ही आपणास सांगणार आहोत घरात घट ठेवण्याचे 3 फायदे. 
 
1 अमृताचा घट - हे मंगल घट समुद्र मंथनाचा प्रतीक देखील आहे. सौख्य आणि भरभराटीचे प्रतीक असे हे कलश याला घट देखील म्हणतात. पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. म्हणून पूजा घरात हे ठेवतात. यामुळे पूजा यशस्वी आणि पूर्ण होते. हे कलश किंवा घट त्याच प्रकारे बनलेले आहे ज्याप्रकारे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदरांचल डोंगराला घुसळून अमृत काढले होते. 
 
असे केसाळ नारळ देखील मंदरांचल डोंगरा प्रमाणे आहेत. कलश हे विष्णू सारखे आहे आणि त्यामध्ये भरलेले पाणी सागरा सारखे आहे. त्यावर बांधलेला दोरा हे वासुकी नागा सम आहे ज्याने मंथन केले गेले होते. यजमान आणि पुरोहित हे देव आणि दानवा प्रमाणे आहे किंवा असं म्हणावं की हे मंथन करणारे आहेत. पूजेच्या वेळी असेच मंत्र पठण केले जाते.
 
2 ईशान्य दिशेने पाणी ठेवावं - वास्तूशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशेने पाणी ठेवावं. असं केल्यानं घरात सौख्य, शांती आणि भरभराट होते. म्हणून घट स्थापनेच्या स्वरूपात पाणी ठेवावं. घरातील ईशान्य कोपरा नेहमी रिकामा ठेवावा आणि तिथे घटस्थापना करावी.
 
3 वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं - असं म्हणतात की मंगल कलशात तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेल असतं, ज्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. नारळ देखील पाण्यानं भरलेलं असतं. दोघांच्या संयोजनाने वैश्विक ऊर्जासारखे वातावरण तयार होते. जे वातावरणाला दिव्य बनवतं. यामध्ये जे सूत बांधले जाते ते ऊर्जा बांधून ठेवते आणि एक वर्तुळाकार वर्तुळ बनवतं. अश्या प्रकारे हे एक सकारात्मक आणि शांतता पूर्ण ऊर्जा तयार करतं, जी हळू-हळू सर्व घरात पसरते.
 
घट स्थापित कसं करावं - ईशान्य जमिनीवर कुंकवाने अष्टदल कमळाची आकृती बनवून त्यावर मंगल कलश किंवा घट ठेवतात. एका तांब्याच्या किंवा काश्याच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये आंब्याचे पानं टाकून त्याचा तोंडावर नारळ ठेवतात. घटावर कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावर मौली बांधतात.