शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (09:08 IST)

Navratri 2021 घटस्थापना शुभ मुहूर्त, यंदा 8 दिवस असेल शारदीय नवरात्र

यंदा नवरात्री नऊ ऐवजी आठ दिवसांची आहे. तिथी क्षय झाल्याने यंदा आठ दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. यंदा दसरा 15 ऑक्टोबर रोजी आहे. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
 
घट स्थापना मुहूर्त : 
प्रतिपदा तिथी प्रारंभ : 6 ऑक्टोबर दुपारी 4 वाजून मिनिटापासून
प्रतिपदा तिथी समाप्त: 7 ऑक्टोबर दुपारी 1 वाजून 46 मिनिटापर्यंत
7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा शुभ वेळ सकाळी 6 वाजून 17 मिनिटापासून ते सकाळी 10 वाजून 11 मिनिटापर्यंत आहे. यावेळी घटस्थापना केल्याने नवरात्री फलदायी राहील.
अभिजीत मुहूर्त 11 वाजून 46 मिनिटापासून ते 12 वाजून 32 मिनिटापर्यंत राहील. स्थानिक पंचांग फरकानुसार, मुहूर्त बदलू शकतो.
व्रत पारण वेळ : नवरात्रीचे पारणे 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 22 मिनिटानंतर होईल.
 
नवरात्रोत्सव 2021 तारखा आणि तिथी
नवरात्रीचा पहिला दिवस - 7 ऑक्टोबर - प्रतिपदा
नवरात्रीचा दुसरा दिवस - 8 ऑक्टोबर - द्वितिया
नवरात्रीचा तिसरा दिवस - 9 ऑक्टोबर - तृतीया/चतुर्थी
नवरात्रीचा चौथा दिवस - 10 ऑक्टोबर -  पंचमी
नवरात्रीचा पाचवा दिवस - 11 ऑक्टोबर - षष्ठी
नवरात्रीचा सहावा दिवस - 12 ऑक्टोबर - सप्तमी
नवरात्रीचा सातवा दिवस - 13 ऑक्टोबर - अष्टमी
नवरात्रीचा आठवा दिवस -14 ऑक्टोबर - नवमी
नवरात्रीचा नववा दिवस - 15 ऑक्टोबर - दसरा
 
या प्रकारे करा घटस्थापना
घट अर्थात मातीचा मातीचा घडा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तात ईशान कोपर्‍यात स्थापित करावा.
जेथे घट स्थापना करायची आहे तिथे एक स्वच्छ लाल कपडा घालून त्यावर घट स्थापित बसवावं.
त्यात सप्त धान्य ठेवावे. 
आता एका कळशात पाणी भरुन त्यावर लाल दोरा बांधून त्याला मातीच्या पात्रवर ठेवा. 
आता कळशावर पानं ठेवा आणि लाल दोरा बांधलेलं नारळ लाल कापडात गुंडाळून ठेवा.
घटावर रोली किंवा चंदनाने स्वास्तिक काढा.
आता घट पूजा करुन गणेश वंदना केल्यानंतर देवीचं आह्वान करुन घट स्थापित करा.
नवरात्रोत्सवात घाटात जव पेरण्याची परंपरा आहे. जव जितके वाढेल तितका देवीचा आशीर्वाद प्राप्त देईल. व्यक्तीच्या घरात सुख आणि समृद्धी नांदेल.
प्रथम मातीच्या भांड्यात थोडी माती घाला आणि नंतर जव घाला. मग मातीचा एक थर पसरवा. पुन्हा एकदा जव घाला. पुन्हा मातीचा थर जमवा. आता त्यावर पाणी शिंपडा. अशा प्रकारे, भांडे वरपर्यंत भरा. आता हे भांडे बसवा आणि त्याची पूजा करा.
 
तांबे किंवा पितळ कलश देखील स्थापित केलं जाऊ शकतं. कलशात गंगेचे पाणी भरा आणि त्यात आंब्याची पाने, सुपारी, हळदीच्या गाठी, दुर्वा, पैसा टाका.
कलशावर मौली बांधा नंतर पानांमध्ये मौली बांधलेलं नारळ ठेवा. दुर्गाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश ठेवा आणि दिवा लावा आणि त्याची पूजा करा. कलश वर झाकण लावायचे असेल तर झाकणात तांदूळ भरा आणि कलश उघडे असेल तर त्यात आंब्याची पाने ठेवा.
आता देवी -देवतांना आवाहन करताना, प्रार्थना करा की 'हे सर्व देवी -देवता, तुम्ही सर्व कृपा करुन 9 दिवस कलशमध्ये विराजित व्हा.'
आवाहन केल्यानंतर सर्व देवता कलशात विराजमान आहेत असे मानत कलशाची पूजा करा. कलशाचा तिलक करा, अक्षता अर्पण करा, फुलांच्या माळा अर्पण करा, सुगंध अर्पण करा, नैवेद्य अर्पण करा म्हणजे फळे आणि मिठाई इ. घटस्थापना किंवा कलश स्थापन केल्यानंतर, देवीचे चौकी स्थापित करा.