शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (08:40 IST)

नवरात्रीत ही 13 कामे करु नका

What to do during Navratri 2024?
देवी दुर्गाच्या 9 दिवसीय नवरात्री व्रतात संयम आणि अनुशासन याचे खूप महत्त्व आहे. देवीला प्रसन्न करायचे असेल तर या 13 चुका करणे टाळा.
 
1-  व्रत करत असणार्‍यांनी दाढी, मिशा आणि केस कापू नयेत.
 
2 - नऊ दिवस नखे कापू नये.
 
3- घरात अखंड ज्योत असल्यास नवरात्रीत घराला ताळा लावू नये किंवा घर रिकामे सोडू नये.
 
4- आहारात तामसिक भोजन, मासांहार ग्रहण करु नये.
 
5- नऊ दिवस उपवास करणाऱ्यांनी घाणेरडे व न धुतलेले कपडे घालू नयेत.
 
6- उपवास करणाऱ्या लोकांनी बेल्ट, चप्पल, शूज, बॅग यासारख्या चामड्याच्या वस्तू वापरू नयेत.
 
7- उपवास करणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू कापू नये.
 
8 - व्रत करणार्‍यांनी नऊ दिवस धान्य आणि मिठाचे सेवन करु नये.
 
9- विष्णु पुराणानुसार नवरात्रीत दिवसा झोपण्यास मनाई आहे.
 
10. एकाच ठिकाणी बसून फराळ करावा.
 
11. चालीसा, मंत्र किंवा सप्तशती पाठ पठण करत असल्यास मधे दुसर्‍यांशी बोलू नये, मधेच आसानवरुन उठू नये.
 
12. अनेकजण भूक भागवण्यासाठी तंबाखू चघळतात, उपवासाच्या वेळी ही चूक करू नका. व्यसनामुळे उपवास मोडतो.
 
13. शारीरिक संबंध ठेवल्याने व्रताचे फळ मिळत नाही.