बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (17:25 IST)

Positivity साठी नवरात्राच्या 9 दिवसापर्यंत हे सोपे उपाय करावे

नवरात्राच्या नऊ दिवस देवी आईची पूजा पूर्ण विधियुक्त केली जाते. या दरम्यान देवी आईच्या 9 वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते. देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास असते. जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास या काही उपायांना अवलंबून या दोषाला दूर करू शकतात.
 
घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्राच्या नऊ दिवसात घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढावं. त्याशिवाय घरातील मुख्य दारावर श्री गणेशाचे चित्र देखील लावावं. यामुळे कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक बनविल्याने घरात सकारात्मकता राहते आणि सर्व थकलेली कामे होऊ लागतात.
 
आंबा आणि अशोकाच्या पानाची माळ बनवून मुख्य दारावर बांधून द्या. नवरात्रात आंब्या आणि अशोकाच्या पानाची माळ बनवून मुख्य दारावर लावल्यानं घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सकारात्मकता येऊन सुख शांतता नांदेल.
 
घराच्या मुख्य दारावर किंवा प्रवेश दारावर लक्ष्मीचे पावलं काढावे. नवरात्रात मुख्य दारावर लक्ष्मीची पावलं काढावे. असे केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांतता आणि समृद्धी नांदते.
 
नवरात्राच्या एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या देऊळात जावं आणि केशरी भात अर्पण करावा. असे केल्यानं घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि देवी आई लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात.